मुख्य सामग्रीवर वगळा

वसुंधरा दिन---

*वसुंधरा दिन* हा पर्यावरणविषयक कार्यक्रमांना पाठबळ देण्याचा पाया आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या सार्वजनिक वचनबद्धतेला   एकदा संजीवनी मिळते. हा दिन साजरा करण्यामुळे जगभर व्यापक वैविध्यपूर्ण कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यासाठी सामाजिक चालना मिळते. वसुंधरा दिन हा जगातील सर्वाधिक मोठा कार्यक्रम आहे. भिन्न पार्श्‍वभूमी, श्रद्धा, विश्‍वास आणि राष्ट्रीयत्व असलेले जगभरातील सर्व लोक हा दिन साजरा करतात. या कार्यक्रमात दरवर्षी एक अब्जाहून अधिक लोक सहभागी होतात. यातून समाज विकास आणि पर्यावरण संरक्षण कार्यक्रमांद्वारे काम करणार्‍या हजारो कार्यकर्त्यांशी वर्षभर समन्वय साधला जातो. जागतिक पातळीवरील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना एकत्र जोडणार्‍या ‘अर्थ डे नेटवर्क ’(EDN) या आंतरराष्ट्रीय संघटनेने वसुंधरा दिनाच्या वाटचालीचा आढावा  प्रसिद्ध केला आहे. 
गेल्या ४५ वर्षांपासून दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस ‘वसुंधरा दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. १९७० च्या दशकामधील आधुनिक पर्यावरण चळवळीचा जन्म हा दिवस साजरा करण्यातूनच झाला, असे अनेक जण मानतात. त्या काळात अमेरिकन लोक ‘व्ही ८ सेडन’ हे भले मोठे वाहन वापरत असत. या वाहनातून वातावरणात सोडला जाणारा धूर मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण करत असे. त्याचप्रमाणे कारखान्यातूनही अनिर्बंधपणे वातावरणात विषारी धूर आणि कसल्याही प्रक्रियेविना रसायनमिश्रित पाणी आसपासच्या परिसरात सोडले जात असे. त्यांना कायद्याची किंवा माध्यमांची भीती नव्हती. लोकांकडून आणि औद्योगिक क्षेत्राकडून होणारे जल-वायू प्रदूषण याकडे ‘समृद्धीचे प्रतिक’ म्हणून अभिमानाने पाहिले जात असे.
  सन १९७० मध्ये ‘वसुंधरा दिन’ साजरा करण्याची कल्पना पुढे आली. ही वसुंधरा दिनाची कल्पना सर्वप्रथम गेलॉर्ड नेल्सन यांनी मांडली. नेल्सन हे त्यावेळी अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्याचे सिनेटर होते.
पहिला वसुंधरा दिन 
अमेरिकेने व्हिएतनामविरोधात पुकारलेल्या युद्धाला अमेरिकेतील विविध विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रचंड विरोध केला.  सन १९६९ मध्ये कॅलिफोर्नियातील सांता बार्बारा येथे प्रचंड प्रमाणात तेलगळती झाली. त्याच्या निषेधार्थ जनतेने मोठ्या प्रमाणात केलेली नासधूस आणि लुटालूट नेल्सन यांनी पाहिली होती. 
नेल्सन यांच्या लक्षात आले की, जल आणि वायू प्रदूषणाच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग केला, सिनेटर नेल्सन यांनी पर्यावरणावर राष्ट्रीय शिकवण देण्याची आपली कल्पना राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमधून जाहीर केली.   २२ एप्रिल रोजी पहिल्या वसुंधरा दिनानिमित्त निरोगी, स्वच्छ आणि शाश्‍वत पर्यावरणासाठी एका किनार्‍यापासून दुसर्‍या किनार्‍यापर्यंत, रस्त्यांवरून, बागांमध्ये फेर्‍या काढण्यात आल्या.
विविध सभागृहांत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.  कारखाने आणि ऊर्जा प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण, विनाप्रक्रिया विषारी पदार्थ फेकून देणे, कीटकनाशकांचा वाढता वापर, जंगलांचा, मोकळ्या जागांचा आणि वन्यसृष्टीचा नाश या सर्वांच्या विरोधात स्वतंत्रपणे लढणार्‍या छोट्या छोट्या गटांच्या लक्षात आले, की आपण सारेजण एकाच उद्दिष्टासाठी लढत आहोत. १९७० मध्ये क्वचितच दिसणारे राजकीय पक्षांचे ऐक्य वसुंधरा दिनाच्या निमित्ताने पहावयास मिळाले.
रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅट्सनी वसुंधरा दिनाला पाठिंबा दिला. गरीब आणि श्रीमंत, शहरातील कुशल कामगार आणि ग्रामीण शेतकरी, उद्योगपती आणि कामगार या सार्‍यांचे एकमत होते. या एकमताच्या जोरावर पहिल्या वसुंधरा दिनी ‘युनायटेड स्टेट्स एन्व्हायरन्मेंटल प्रोटेक्शन एजन्सी’ची स्थापना झाली, तसेच स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि नामशेष होऊ पाहणार्‍या प्रजातींसाठी कायदे करण्याचा मार्ग मोकळा झाला. या दिवसाची आठवण सांगताना गेलॉर्ड नेल्सन म्हणतात, “वसुंधरा दिन हा एक प्रकारचा जुगार होता. मात्र, तो सफल झाला.
 . या मोहिमेत १४१ देशांतील वीस कोटींहून अधिक लोक सहभागी झाले. सन १९९० च्या वसुंधरा दिनामुळे टाकाऊ वस्तूंवर पुनर्प्रक्रिया करून त्यांचा पुनर्वापर करण्याच्या  विषयाला जागतिक पातळीवर चालना मिळाली. यातूनच सन १९९२ मध्ये ‘रिओ दी जानेरो’ येथे संयुक्त राष्ट्रसंघाकडून‘वसुंधरा शिखर परिषदे’चे आयोजन करण्यात आले. या वाटचालीची दखल घेऊन सन १९९५ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिटंन यांनी ‘वसुंधरा दिन’ साजरा करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल सेनेटर नेल्सन यांना ‘स्वातंत्र्याचे प्रेसिडेन्शियल पदक’ देऊन त्यांचा गौरव केला. 
तुम्हाला पृथ्वीसाठी जे जे चांगले करता येईल, ते ते सारे करा, सारे काही मजेत करा. लोकांना भेटा. त्यासाठी वसुंधरा दिन कधी येईल, याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक दिवस हा वसुंधरा दिनच असतो.
‘अर्थ डे नेटवर्क’ (EDN) म्हणजे काय?
सन १९७० मध्ये पहिल्या जागतिक वसुंधरा दिनाच्या आयोजकांनी ‘अर्थ डे नेटवर्क या संस्थेची स्थापना केली. हे नेटवर्क संपूर्ण वर्षभर जागतिक पर्यावरण, नागरिकत्व आणि कृती यांना प्रोत्साहन देते. जगभर पर्यावरणविषयक जागृतीला चालना आणि गती देते. ‘अर्थ डे नेटवर्क’च्या माध्यमातून पर्यावरण चळवळीचे प्रमुख व चळवळीचे कार्यकर्ते परस्परांच्या संपर्कात राहतात आणि परस्परांशी आंतरक्रिया करतात. विचारांची देवाणघेवाण करतात आणि या विचारांचा प्रभाव आपापल्या समाजावर पाडण्याचा प्रयत्न करतात. याद्वारे स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक धोरणांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणतात. आंतरराष्ट्रीय जाळे हे १९२ देशांतील तब्बल २२ हजार संघटनांपर्यंत पसरलेले आहे. 
आर्थिक वृद्धी आणि शाश्‍वतता या दोन्ही गोष्टी यंदा एकत्रित नांदू देत, तसेच यंदा नागरिक आणि संस्था-संघटना यांनी खनिज तेलापासून दूर होऊन स्वच्छ ऊर्जेच्या पर्यायांमध्ये आपला पैसा गुंतवला पाहिजे.
 सर्वच देशांनी भविष्यात कार्बनच्या उत्सर्जनात कपात करण्यासाठी वचनबद्ध झाले पाहिजे. आपल्याकडे तंत्रज्ञान आहे. आता आपल्याला फक्त इच्छाशक्तीचीच गरज आहे.

शाश्‍वतता हेच विकासाचे एकमेव उत्तर आहे.
आता नेतृत्वाची वेळ आपलीच आहे. आपले जागतिक नेते आपल्या मागे येतील आणि आपण घेतलेल्या निर्णयाचे पालन करतील
 
स्त्रोत: वनराई

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

#तारे जमी पर -

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.