मुख्य सामग्रीवर वगळा

यशवंतराव बळवंतराव चव्हाण

*यशवंतराव बळवंतराव चव्हाण*🏵️ यांचा जन्म १२ मार्च, १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी १ मे १९५८ रोजी धुम्या गडावर जाऊन तिथे पांडुरंगाची मूर्ती स्थापन केली व व राष्ट्रसंत भगवानबाबांच्या च्या समोर धूम्या गडास भगवानगड नाव दिले. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे.
इ.स. १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर १ मे, १९६० महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. इ.स. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान  पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान,  केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री,  संरक्षणमंत्री,  परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही  झाले.यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व इत्यादीशी निगडीत आहेत.
यशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. त्यांच्या मते, जमीन कसणारा शेतजमिनीचा मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून शेतीचा विचार केला. भारतात शेती क्षेत्रात भूमिहीनांची संख्या अधिक आहे. म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनीचा एक ते दोन टक्के जमीन त्यांना द्यावी. तसेच जमीन अविकसित असल्याने ती अनुत्पादक व पडीक राहिली आहे. अशा जमिनी लागवडीखाली आणणे आवश्यक आहे. शेती व्यापारी तत्वाने केली पाहिजे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे. नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत. धरणे बांधल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे. शेतकऱ्यांनी कृषीशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.
यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणतात की, ग्रामीण भागात उद्योग सुरु करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविता येईल. औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्त्वपूर्ण आहे. देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी ते औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लानची कल्पना मांडतात. अविकसित भागात विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली. याशिवाय, राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी ते सहकाराचा पुरस्कार करतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशाच्या विकासासाठी सहकारी तत्वे फार उपयुक्त ठरतात.
पंचायत राज या त्रिस्तरीय (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) व्यवस्थेची सुरुवात. (प्रशासकीय विकास)
- राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ. (आर्थिक विकास)
- कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्यांचा प्रचार. कोयना व उजनी ह्या प्रमुख प्रकल्पांच्या उभारणीला गती. (मूलभूत सोयी सुविधांचा विकास)
- १८ सहकारी साखर कारखान्यांची स्थापना. (सहकाराला चालना)
- मराठवाडा (आत्ताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) व कोल्हापूर विद्यापीठ यांची (शिवाजी विद्यापीठाची) स्थापना. (शैक्षणिक विकास)
- राज्यातील कृषी विद्यापीठांच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग. (कृषिविकास)
- मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्र्वकोश मंडळाची स्थापना. (सांस्कृतिक विकास)
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून ते ना.धों. महानोरांपर्यंतच्या विचारवंतांशी व साहित्यिकांशी त्यांचे चांगले संबंध होते.  कृष्णाकाठ, ऋणानुबंध आदी पुस्तकांतून त्यांच्यातील लेखकही दिसतो..💐💐

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे दिनांक : 28/08/2026 प्रति, 1. आयुक्त, महानगरपालिका (सर्व) 2. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) 3. मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगर परिषद 4. अध्यक्ष / सचिव, संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था (मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्था) विषय : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 — मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. संदर्भ : 1. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्र. सीईटी-2015/प्र.149/टीएनटी-1, दि. 07/02/2019. 2. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.311/टीएनटी-1, दि. 01/01/2019. 3. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2022/प्र.106/टीएनटी-1, दि. 10/11/2022. 4. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2023/प्र.174/टीएनटी-1, दि. 21/06/2023. 5. शासन निर्णय क्र. संकीर्ण-2018/प्र.397/टीएनटी-1, दि. 07/02/2019 व त्यावरील शुद्धिपत्रके दि. 25/02/2019, 16/05/2019 व 12/06/2019. 6. शासन निर्णय क्र. संकीर्ण-...

जगातील टॉपहॉट 50 शहर .......@नवतपा #नवतपा म्हणजे काय?? २५ मे ते 2 जून

नवतपा हा भारतीय हवामानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि तीव्र उष्णतेचा कालखंड आहे. “नवतपा” या शब्दाचा अर्थ “नऊ दिवसांची तीव्र उष्णता” असा होतो. साधारणपणे मे महिन्याच्या शेवटी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो आणि त्या काळात पृथ्वीवर सर्वाधिक तापमान जाणवते. या नऊ दिवसांच्या कालखंडाला नवतपा असे म्हटले जाते. नवतपा हा केवळ पारंपरिक समज नसून त्यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारणे आहेत. पृथ्वीचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला असल्यामुळे वर्षभर ऋतू बदलतात. उन्हाळ्यात उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने झुकलेला असतो. त्यामुळे भारतावर सूर्यकिरणे जवळजवळ सरळ पडतात आणि जमीन अधिक तापते. हीच प्रक्रिया नवतप्याच्या काळात अत्यंत तीव्र स्वरूप धारण करते. या काळात दिवस मोठे आणि रात्री लहान असतात. सूर्यप्रकाश जास्त वेळ मिळाल्यामुळे जमिनीत उष्णता मोठ्या प्रमाणात साठते. हवेत आर्द्रता कमी असल्यामुळे उष्णता अधिक तीव्रतेने जाणवते. त्यामुळे दुपारी तापमान 45 ते 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. नवतप्याचा सर्वाधिक परिणाम उत्तर भारत, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांमध्ये दिसतो. राजस्थानमध्ये वाळवंटी हवामानामुळ...

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे???

जनगणना नकाशा कोणत्या दिशेने काढावे????? जनगणनेचा नकाशा (नजरी नक्शा) तयार करताना  उत्तर-पश्चिम  (North-West)  दिशेकडून सुरुवात करणे अधिक सोयीस्कर आणि प्रमाणित मानले जा नकाशा तयार करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या ..... दिशा निर्देश:  प्रमाणित नकाशामध्ये  उत्तर (North)  दिशा नेहमी वरच्या बाजूला दर्शवली जाते. त्यावरून इतर दिशा (पूर्व, पश्चिम, दक्षिण) ठरवा. पहिली पायरी:  नकाशा काढताना आपल्या भागाच्या उत्तर-पश्चिम कोपऱ्यातून सुरुवात करा. घर मोजणी:  मोजणी नेहमी  झिग-झॅग (सर्पाकार) पद्धतीने  करावी. म्हणजेच, एका ओळीतील घरे पूर्वेकडून पश्चिमेकडे मोजली, तर पुढील ओळीतील घरे पश्चिमेकडून पूर्वेकडे मोजावीत. महत्त्वाची ठिकाणे:  रस्त्यावरील घरे, गल्ल्या, आणि महत्त्वाची ठिकाणे (उदा. शाळा, मंदिर, दवाखाना, इ.) नकाशात स्पष्टपणे नोंदवा.